About the Book:
भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित आणि वाचली जात असली तरी मूलतः ती संस्कृत महाकाव्य ‘महाभारत’ यात सापडते. महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. या युगाच्या आरंभी, सुमारे ५,००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त आणि मित्र अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्यांच्यातील संवाद हा मानवी इतिहासातील सर्वांत महान तत्त्वज्ञानविषयक आणि धर्मविषयक संवादांपैकी एक आहे. तो संवाद एका युद्धापूर्वी घडला. हे यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे शंभर पुत्र कौरव आणि पांडूचे पुत्र पांडव यांच्यात घडले. न __ धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ होते आणि त्यांचा कुरुवंशात जन्म झाला होता. ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत याच्यामुळेच महाभारत हे नाव पडले. थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता, त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले.
पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्याच्या पाच पुत्रांचे पालनपोषण, काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले. अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजकुटुंबात वाढले. या सर्व पुत्रांना द्रोणाचार्यांनी युद्धकलेत निष्णात केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले. ____ तरीदेखील धृतराष्ट्राचे पुत्र आणि विशेषतः सर्वांत थोरला पुत्र दुर्योधन पांडवाचा अतिशय द्वेष करायचा. राज्यपद पांडूच्या पुत्रांना न मिळता आपल्याच पुत्रांना मिळावे अशी आंधळ्या आणि दुष्टप्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची इच्छा होती. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला. पांडव आपले काका विदुर तथा मामेभाऊ
Ajay (verified owner) –
Good quality.
Anjum P (verified owner) –
Good quality.
neelima (verified owner) –
The product is firmly packed.
neelesh (verified owner) –
Very fast delivery.
krishma (verified owner) –
Very useful
antarika (verified owner) –
Very useful
Karan (verified owner) –
Very fast delivery.