ए. सी. भक्तिवेदांत स्वामी हे भारतवासी सत्पुरुष जागतिक प्रसिद्धीच्या झोतात येणार होते, ते १९६५ सालानंतर आणि तेही अमेरिकेत जाऊन पोचल्यावर. पुढे ते श्रील प्रभुपाद या नावाने ओळखले जाऊ लागले. भारत सोडण्याआधी त्यांनी तीन पुस्तके लिहिली होती, तर पुढील बारा वर्षांत ते साठाच्या वर पुस्तके लिहिणार होते. भारत सोडण्याआधी त्यांनी केवळ एक शिष्य दीक्षित केला होता, तर नंतरच्या एका तपात ते चार हजारांच्या वर शिष्यांना दीक्षा देणार होते. त्यांनी भारत सोडण्यापूर्वी कोणालाही असा विश्वास वाटला नव्हता की, कृष्णभक्तांची एक जागतिक संघटना निर्माण करण्याचे त्यांचे थोर स्वप्न साकार होईल; परंतु नंतरच्या दहा वर्षांत ते कृष्णभावनेचे जागरण करणारी आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करून ती वाढवणार होते व तिची शंभरावर केंद्रे उघडणार होते. अमेरिकेस जाण्याआधी ते कधीही भारताबाहेर गेले नव्हते, पण नंतरच्या एका तपाच्या कालावधीत कृष्णभावनेची चळवळ जगभर पसरविण्यासाठी त्यांना अनेक वेळा जगप्रवास करण्याचा योग आला.
जरी त्यांच्या आध्यात्मिक कर्तृत्वास अशा तऱ्हेने उतारवयात क्रांतिकारक स्वरूप प्राप्त झालेले होते, तरी त्यांच्या वयाची पहिली ६९ वर्षे त्या कार्याची पूर्वतयारी करण्याकरिताच गेली होती आणि अमेरिकन लोकांना प्रभुपाद व त्यांची शिकवण या गोष्टी अज्ञात आणि अकस्मात उद्भवलेल्या आणि म्हणून अल्लाउद्दीनच्या दिव्यातून प्रकट झालेल्या चमत्कारिक जेनीप्रमाणे भासू लागल्या तरी ते शतकानुशतकांच्या जुन्या संस्कृतीचे महान प्रतिनिधी होते.
श्रील प्रभुपाद म्हणजेच अभय चरण डे १ सप्टेंबर १८९६ रोजी भारतामध्ये कलकत्ता येथे जन्मले. त्यांचे वडील गौर मोहन डे हे कापडाचे व्यापारी होते. त्यांच्या आईचे नाव रजनी देवी असे होते. बंगाली रीतिरिवाजाप्रमाणे त्यांच्या आईवडिलांनी जेव्हा ज्योतिष्याला या आपल्या मुलाची पत्रिका तयार करायला सांगितली तेव्हा त्यातील शुभ-योग ऐकून आईवडिलांना अत्यानंद झाला. ज्योतिषाने असे ठाम भाकीत
priyank (verified owner) –
The product is firmly packed.
prathu (verified owner) –
Very useful
priyanka (verified owner) –
Very fast delivery.
krishma (verified owner) –
The product is firmly packed.
Sreedhar (verified owner) –
Good quality.
krishna (verified owner) –
I recommend this to everyone to read.
neelima (verified owner) –
Good service.
Shilpa Sandeep Rane (verified owner) –
Shamala Mahale (verified owner) –