प्रस्तावना
“हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णांनी स्वधामात गमन केल्यानंतर त्वरित त्याचा उदय झालेला आहे. या कलियुगात घनदाट अज्ञानरूपी अंधकाराने दृष्टिहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल.” (श्रीमद्भागवत १.३.४३) ___ वैदिक कालातीत ज्ञान प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये व्यक्त झाले आहे, जे मानवी ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करते. प्रारंभी या ज्ञानाचे संरक्षण मौखिक परंपरेने केले जात असे; परंतु पाच सहस्र वर्षांपूर्वी श्रील व्यासदेव या भगवंतांच्या “वाङ्मयीन अवताराने” सर्वप्रथम वेदांना लिखित स्वरूप प्रदान केले. वेदांचे संकलन केल्यानंतर त्यांनी वेदांचे सार “वेदान्त सूत्राच्या” रूपात प्रस्तुत केले. श्रीमद्भागवत (भागवत पुराण) व्यासदेव रचित वेदान्त सूत्रावरील भाष्य आहे. याचे लिखाण त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्व अवस्थेत, आपले गुरू श्री नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली केले. “वैदिक वाङ्मयरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ” म्हणून गौरविलेले हे श्रीमद्भागवत वैदिक ज्ञानाचे सर्वांत परिपूर्ण व प्रमाणित स्पष्टीकरण आहे.
श्रीमद्भागवताची रचना केल्यावर व्यासदेवांनी त्याचे सार आपला पुत्र, श्री शुकदेव गोस्वामी यांना अवगत करून दिले. त्यानंतर शुकदेव गोस्वामींनी हस्तिनापूर (सध्याचे दिल्ली) येथे गंगातटी ऋषिमुनींच्या सभेत परीक्षित महाराजांना संपूर्ण भागवत ऐकविले. परीक्षित महाराज चक्रवर्ती सम्राट तथा महान राजर्षी होते. ज्या वेळी त्यांना सावध करण्यात आले की, सात दिवसांत चाचा मृत्यू होईल त्या वेळी त्यांनी आपल्या संपूर्ण साम्राज्याचा त्याग केला पण आमरण उपोषण करण्यासाठी तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या प्राप्तीसाठी
श्रीमद्भागवत ते गंगातटी गेले. परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारलेल्या गंभीर प्रश्नाने भागवताचा आरंभ होतो.
परीक्षित महाराजांनी विचारलेले प्रश्न व इतर अनेक प्रश्नांना, जे आत्म्याच्या स्वरूपापासून ब्रह्मांडाच्या उत्पत्तीविषयीचे होते, श्रील शुकदेव गोस्वामींनी जी उत्तरे दिली ती ऐकून सर्व साधुसभा राजाच्या मृत्यूपर्यंत सात दिवस मंत्रमुग्ध झाली होती. ज्या वेळी शुकदेव गोस्वामींनी प्रथमच भागवत सांगितले, त्या वेळी श्री सूत गोस्वामी तेथे उपस्थित होते आणि त्यांनी नैमिपारण्यातील ऋषींच्या सभेत हेच भागवत पुन्हा सांगितले. जनसामान्यांच्या आध्यात्मिक कल्याणाची इच्छा बाळगून हे सर्व ऋपी नुकत्याच प्रारंभ झालेल्या कलियुगाच्या दुष्परिणामांचे निवारण करण्याकरिता दीर्घकालीन यज्ञसत्रांचे अनुष्ठान करण्यासाठी एकत्र आले होते. जेव्हा या ऋषींनी सूत गोस्वामींना वैदिक ज्ञानाचे सार कथन करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी, शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना ऐकविलेले सर्व अठरा सहस्र श्लोकांचे श्रीमद्भागवत स्मरण करून कथन केले.
श्रीमद्भागवताचा वाचक, परीक्षित महाराजांच्या प्रश्नांची जी शुकदेव गोस्वामींनी उत्तरे दिली होती ती सूत गोस्वामींच्या मुखातून ऐकतो. त्याचप्रमाणे तो कधीकधी नैमिषारण्यात एकत्र आलेल्या साधूंचे प्रतिनिधी, शौनक ऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नांना सूत गोस्वामींनी दिलेली सरळ उत्तरे ऐकतो. अशा प्रकारे एकाच वेळी दोन संभाषणांचे श्रवण होत असते-एक गंगातटी परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींमधील संभाषण व दुसरे नैमिषारण्यातील सूत गोस्वामी आणि साधूंचे प्रमुख असलेल्या शौनक ऋषींमधले संभाषण. एवढेच नव्हे, तर परीक्षित महाराजांना उपदेश करीत असताना शुकदेव गोस्वामा कित्येकदा ऐतिहासिक घटनांचे वर्णनही करतात आणि नारद मुनी तथा वसुदेवासारख्या थोर महात्म्यांमधील दीर्घ तात्त्विक चर्चेचा वृत्तान्तही देतात. भागवताच्या इतिहासाची अशी पार्श्वभूमी समजून घेतल्यावर वाचकाला त्यातील संभाषणाच मिश्रण आणि निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या घटनांचे सुलभपणे आकलन होईल. भागवताच्या कथनात घटनांच्या क्रमवारीला महत्त्व नसून त्यातील वन्यज्ञानाला महत्त्व असल्यामुळे भागवताच्या गंभीर संदेशाचे पूर्णपणे रसास्वादन करण्याकरिता वाचकाने त्याच्या विषयवस्तुसंबंधी केवळ जागरूक असणे आवश्यक आहे. ___ या ग्रंथाचे अनुवादक ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे भागवताची तुलना खडीसाखरेशी करतात-आपण कुठूनही चाखली तरी ती तेवढीच गोड अन् रुचकर लागेल. म्हणून भागवताचे माधुर्य चाखण्याकरिता आपण कोणत्याही स्कंधापासून प्रारंभ करू शकतो. अशा प्रारंभिक रसास्वादनानंतर मात्र गंभीर वाचकाने प्रथम स्कंधापासून पुन्हा प्रारंभ करावा आणि श्रीमद्भागवताचे सर्व स्कंध एकामागोमाग एक असे वाचावेत.
भागवताची ही आवृत्ती विश्वातील सर्वाधिक प्रसिद्ध, भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानाचे उपदेशक, कृष्णकृपामूर्ती श्रील ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या पांडित्यपूर्ण आणि भक्तिमय प्रयत्नांचे फळ आहे. त्यांचे संस्कृत-पांडित्य आणि वैदिक संस्कृतीशी आधुनिक जीवनपद्धतीची सांगड घालण्याचे कौशल्य यांचे फळ म्हणजेच या महत्त्वपूर्ण साहित्यावरील हे भव्य भाष्य होय. __ वाचकांना हा ग्रंथ अनेक कारणांसाठी महत्त्वाचा वाटेल. ज्यांना भारतीय संस्कृतीच्या उगमाचा अभ्यास करावयाचा असेल, त्यांना या ग्रंथात भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक पैलूवर विस्तृत माहिती मिळेल. तुलनात्मक तत्त्वज्ञान आणि धर्माच्या विद्यार्थ्यांना भागवतात भारताच्या सखोल आध्यात्मिक संस्कृतीचे सूक्ष्म निरीक्षण सापडेल. समाजशास्त्रज्ञांसाठी आणि मानववंश-शास्त्रज्ञांसाठी भागवत एका शांतिमय आणि वैज्ञानिक पद्धतीने सुनियोजित वैदिक संस्कृतीची व्यावहारिक कार्यपद्धती प्रकट करते, जिच्या सिद्धान्तांची गोळाबेरीज अत्यंत विकसित सार्वभौम आध्यात्मिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे. वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांना ‘भागवत’ उत्कृष्ट काव्याची सर्वश्रेष्ठ कृती वाटेल. मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा ग्रंथ चेतनाशक्ती, मानवी आचरण आणि आत्मस्वरूपाच्या तात्त्विक अध्ययनाचा मौलिक दृष्टिकोन प्रदान करतो. आणि, ज्यांना आध्यात्मिक सत्याचा शोध घ्यावयाचा आहे, त्यांच्याकरिता भागवत ग्रंथ एका व्यावहारिक मार्गदर्शकाचे कार्य करतो, जो शेवटी आत्मज्ञान तथा परम सत्याचा साक्षात्कार करून देतो. भक्तिवेदांत बुक ट्रस्ट द्वारा प्रस्तुत, अनेक खंडांचा हा ग्रंथ प्रदीर्घ काळापर्यंत आधुनिक मानवाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करील.
Srimad Bhagavatam Maha purana 1st Canto- Marathi (मराठी)
₹450.00 ₹360.00
- Author :A. C. Bhaktivedanta Swami Prabhupada
- Binding :Hardcover
- Pages:930 pages
- Publisher: The Bhaktivedanta Book Trust
- Language: Marathi
- ISBN-9789383095391
- Product Dimensions: 22×14.5×3.7
- weight:gram:934
SKU: MRT036
Categories: Bhagavata Purana, Marathi
Brand
Bhaktivedanta Book Trust
The Bhaktivedanta Book Trust (BBT) is the world’s largest publisher of classic Vaishnava texts and contemporary works on the philosophy, theology, and culture of bhakti-yoga. Its publications include traditional scriptures translated into 87 languages and books that explain these texts. The BBT also publishes audiobooks and eBooks. BBT titles range in complexity from brief, introductory volumes and summary studies to multivolume translations with commentary.

Weight | 1400 g |
---|---|
Dimensions | 22 × 14.5 × 3.7 cm |
9 reviews for Srimad Bhagavatam Maha purana 1st Canto- Marathi (मराठी)
Add a review Cancel reply
Related products
Sale!
Bhagavata Purana
Srimad Bhagavatam Maha Puran (18 Volume Set)- Marathi (मराठी)
Rated 4.57 out of 5
Sale!
Ajay (verified owner) –
I recommend this to everyone to read.
Ajay (verified owner) –
Very well worth the money.
anuj (verified owner) –
Very fast delivery.
Aadarsh (verified owner) –
Very well worth the money.
priyanka (verified owner) –
Good service.
arjuneshar das (verified owner) –
easy to understand and read.
prathu (verified owner) –
The product is firmly packed.
Dylan (verified owner) –
The product is firmly packed.
Manish p. (verified owner) –